शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Breaking News: ब्रेकिंग न्यूज! राजीव गांधीचा मारेकरी पेरारिवलन तुरुंगातून सुटणार; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 11:39 IST

Rajiv Gandhi Latest News: राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने ती जन्मठेपेत बदलली होती. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोषींपैकी एक आरोपी एजी पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नलिनी श्रीहरन, मरुगन, एक श्रीलंकन नागरिकासहित अन्य ६ आरोपींच्या सुटकेचा मार्गदेखील मोकळा होण्याची शक्यता आहे. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने ती जन्मठेपेत बदलली होती. 

आता यापैकी एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा पूर्ण झाल्याने सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे अन्य सहा जणांच्या देखील सुटकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पेरारिवलन गेल्या ३१ वर्षांपासून तुरुंगात आहे. पेरारिवलन याने त्याच्या सुटकेला झालेल्या विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. 2018 मध्ये तामिळनाडू सरकारने त्याच्या सुटकेची शिफारस केली होती. यानंतर हे प्रकरण कायदेशीर कचाट्यात अडकले होते. 

21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे एका जाहीर सभेदरम्यान हत्या करण्यात आली होती. यानंतर 11 जून 1991 रोजी पेरारिवलनला अटक करण्यात आली. त्याने आरोपींना वयाच्या १९ व्या वर्षी सेल विकत घेऊन दिले होते, असा आरोप होता. 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय