शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING : मुंबईहून निघालेल्या ट्रेनला भीषण आग; प्रवाशांना डब्यातून खाली उतरवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 15:59 IST

Humsafar Express Train Fire : मुंबईहून निघालेल्या रेल्वे गाडीला गुजरातमधील वलसाड येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

वलसाड : मुंबईहून निघालेल्या रेल्वे गाडीला गुजरातमधील वलसाड येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वलसाडमध्ये 'हमसफर सुपरफास्ट एक्सप्रेस' ट्रेनला आग लागली अन् एकच खळबळ माजली. ही गाडी मुंबईहून अहमदाबादला जात होती. प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात यश आले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. वलसाडमधून जात असताना तिरुच्छिरापल्ली जंक्शन ते श्री गंगानगर जंक्शन या ट्रेन क्रमांक २२४९८ च्या पॉवर कार/ब्रेक व्हॅन कोचमध्ये आग आणि धूर दिसून आला. शेजारील डब्यातील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर उतरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते. आग लागलेला डबा वेगळा केल्यानंतर गाडी पुढे सोडण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. 

वलसाडच्या अलीकडे घडली दुर्घटना हमसफर एक्स्प्रेसच्या जनरेटर कोचला आग लागल्याची घटना गाडी वलसाड रेल्वे स्थानकावरून सुरतकडे निघाली असतानाच घडली. जेव्हा ट्रेन वलसाड जिल्ह्यातील छिपवाडमध्ये पोहोचली तेव्हा जनरेटर कोचमध्ये अचानक आग लागली, जी वेगाने मागील पॅसेंजरच्या डब्यात पसरली. त्यामुळे रेल्वेत एकच गोंधळ उडाला. ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि जळणारे डबे उर्वरित ट्रेनपासून वेगळे करण्यात आले.

 गुजरातमध्ये ट्रेनला आग लागण्याची दुसरी घटनागुजरातमध्ये ट्रेनला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. आठ दिवसांपूर्वी दाहोद आनंद मेमू ट्रेन क्रमांक ९३५० च्या इंजिनला भीषण आग लागली होती. दाहोदपासून दहा किमी अंतरावर असलेल्या जेकोट रेल्वे स्थानकावर गोध्रा जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांना उतरवताना लागलेली आग लगेचच दोन डब्यांमध्ये पसरली. परंतु सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. जळत्या ट्रेनची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली होती.

टॅग्स :Gujaratगुजरातrailwayरेल्वेfireआग