शटर तोडून ६४ हजाराचे दागिने पळविले
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:34+5:302015-02-18T00:13:34+5:30
शटर तोडून ६४ हजाराचे दागिने पळविले

शटर तोडून ६४ हजाराचे दागिने पळविले
श र तोडून ६४ हजाराचे दागिने पळविलेनागपूर : अज्ञात आरोपीने वैशालीनगर सिमेंट रोडवरील आकाश ज्वेलर्सचे शटर तोडून सोन्याचांदीचे पॉलिश केलेले ६४ हजार ९०० रुपयांचे दागिने पळविल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बंडु पांडुरंग कुंभारे (६४) रा. हनुमान सोसायटी वैशालीनगर यांचे मेहंदीबाग बसस्टॉप वैशालीनगर सिमेंट रोडवर आकाश ज्वेलर्स नावाची दोन दुकाने आहेत. सोमवारी रात्री ८.३० वाजता ते आपले दुकान बंद करून घरी गेले. अज्ञात आरोपीने त्यांच्या दुकानाचे शटर तोडून पॉलिश केलेले सोन्याचांदीचे ६४ हजार ९०० रुपयांचे दागिने चोरून नेले.