खाजगी जागेवरील अतिक्रमण तोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:32+5:302016-02-02T00:15:32+5:30

खाजगी जागेवरील अतिक्रमण तोडा
>जळगाव-मेहरूण शिवारातील शेत सर्व्हे नं.१५/३-ब/२/१ या बखळ खळे प्लॉट जागेपैकी पिम बाजूकडील १८४० चौरस फूट बखळ जागेवर इकरा एज्युकेशन सोसायटीने तसेच रशिद ए. मेमन यांनी अतिक्रमण केले असल्याची तक्रार दिलीपकुमार हिराचंद जैन यांनी मनपा आयुक्तांकडे लोकशाही दिनी केली आहे. जैन यांच्या पत्नी नलिनी यांच्या नावावर ही जागा आहे. मनपाने हे अतिक्रमण तोडण्याची मागणी केली आहे.