‘हरित’ विश्वकपसाठी ब्राझीलचा पुढाकार
By Admin | Updated: May 29, 2014 04:33 IST2014-05-29T04:33:21+5:302014-05-29T04:33:21+5:30
ब्राझीलने या वर्षी होणार्या फुटबॉल विश्वकपला पर्यावरणासाठी अनुकूल बनविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे़

‘हरित’ विश्वकपसाठी ब्राझीलचा पुढाकार
ब्रासिलिया : ब्राझीलने या वर्षी होणार्या फुटबॉल विश्वकपला पर्यावरणासाठी अनुकूल बनविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे़ या विश्वकपला प्रदूषणापासून दूर ठेवण्यासाठी अनेक उपक्रम होती घेतले आहेत़ त्यात हरित पासपोर्टसह अन्य योजनांचा समावेश करण्यात आला आहे़ ब्राझीलचे पर्यावरणमंत्री इजाबेला टेक्सेरा यांनी या अभियानाची सुरुवात केली़ ते म्हणाले, आम्हाला हरित लक्ष्य साध्य करायचे आहे़ विश्वकप आणि अन्य बड्या स्पर्धेदरम्यान स्टेडियम निर्माण, संघ आणि प्रशंसकांची हवाई यात्रा, तसेच सामन्याच्या आयोजनापर्यंत पृथ्वीला गरम करणारा कार्बन डायआॅक्साईड मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो़ याला आळा बसण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला आहे़ टेक्सेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जून ते १३ जुलैदरम्यान होणार्या या फुटबॉल विश्वचषकादरम्यान जवळपास ५९,००० टन क ार्बन थेट पर्यावरणात पोहोचण्याची शक्यता आहे़ हे लक्षात घेऊन सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी एक कार्यक्रम लाँच केला आहे़ यानुसार हरित पासपोर्ट योजनेंतर्गत फुटबॉल प्रेमींना पर्यावरणाच्या दृष्टीने स्थानिक पर्यटनासाठी प्रेरित करण्यात येणार आहे़ जवळपास ६ लाख विदेशी आणि ३१ लाख ब्राझीलचे पर्यटक विश्वकपसाठी येण्याची शक्यता आहे़ (वृत्तसंस्था)