गोवा मंत्र्यांची ब्राझील वारी आता स्वखर्चाने!
By Admin | Updated: June 14, 2014 04:33 IST2014-06-14T04:33:16+5:302014-06-14T04:33:16+5:30
राज्य सरकारच्या तिजोरीतून ८९ लाख रुपये खर्च करून ब्राझीलला फुटबॉल सामने पाहण्यासाठी निघालेल्या मनोहर पर्रीकर सरकारमधील तिघे मंत्री व तीन आमदार आता स्वखर्चाने ब्राझील वारी करणार

गोवा मंत्र्यांची ब्राझील वारी आता स्वखर्चाने!
सद्गुरू पाटील, पणजी
राज्य सरकारच्या तिजोरीतून ८९ लाख रुपये खर्च करून ब्राझीलला फुटबॉल सामने पाहण्यासाठी निघालेल्या मनोहर पर्रीकर सरकारमधील तिघे मंत्री व तीन आमदार आता स्वखर्चाने ब्राझील वारी करणार आहेत. जनमताचा रेटा आणि सरकारी उधळपट्टीवरील टीकेनंतर सरकारने माघार घेतली आहे. ब्राझील दौऱ्यावरील सरकारी प्रतिनिधींचा खर्च सरकार करणार नाही, असे शुक्रवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले.
गेली दोन वर्षे विविध कारणांवरून मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांचे विदेश दौरे सुरू आहेत. कधी कचरा प्र्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी जर्मनीला शिष्टमंडळे पाठवली जातात, तर कधी पर्यटनाची जाहिरात करण्याच्या नावाखाली विदेशात मंत्री व अधिकाऱ्यांचे पथक पाठवले जाते. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे तर अडीच महिने विदेशात होते. बहुतांश मंत्र्यांनी शासकीय तिजोरीतून बराच खर्च करून विदेश दौरे केले आहेत. सध्याही जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर व वीजमंत्री मिलिंद नाईक हे विदेश दौऱ्यावर आहेत. जून महिन्याच्या अखेरीस क्रीडा (पान १० वर)