ब्राझील, मेक्सिकोने उडवला प्रतिस्पर्ध्यांचा धूव्वा

By Admin | Updated: June 24, 2014 04:48 IST2014-06-24T04:04:45+5:302014-06-24T04:48:16+5:30

भारतामध्ये टिव्हीवर फिफा विश्चचषक पाहणा-या फुटबॉल प्रेमींची सोमवारची मध्यरात्र ख-या अर्थाने सार्थक झाली.

The Brazilian, Mexico's Blown Rivals | ब्राझील, मेक्सिकोने उडवला प्रतिस्पर्ध्यांचा धूव्वा

ब्राझील, मेक्सिकोने उडवला प्रतिस्पर्ध्यांचा धूव्वा

>ऑनलाइन टीम 
अरेना पर्नांबुको रेसिफे, दि. २४ - भारतामध्ये टिव्हीवर फिफा विश्चचषक पाहणा-या फुटबॉल प्रेमींची सोमवारची मध्यरात्र ख-या अर्थाने सार्थक झाली. मध्यरात्री दीड वाजता एकाचवेळी मेक्सिको विरूध्द क्रोएशिया आणि ब्राझील विरूध्द कॅमेरून यांच्यात झालेल्या सामन्यात ब्राझील आणि मेक्सिको संघाने प्रतिस्पर्धी संघाचा धूव्वा उडवला. मेक्सिकोने क्रोएशियाचा ३-१ असा  पराभव केला तर ब्राझीलने कॅमेरूनचा ४-१ असा पराभव करीत दणदणीत विजय मिळविला. 
पाच वेळा विश्वचॅम्पियन राहिलेल्या ब्राझील संघाने सोमवारी आपणच खरे चॅम्पियन असल्याचे या सामन्यात दाखवून दिले. स्पर्धेतील अ गटात चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानांवर विराजमान असलेल्या ब्राझिलचा संघाने या विजयाबरोबर अव्वल क्रमांकासह अंतिम १६ संघात आपले स्थान निश्चित केले आहे. ब्राझिलकडून पहिला गोल नेयमारने १७ मिनिटाला केला. त्यानंतर ३५ व्या मिनिटाला दुसरा गोल करीत नेयमारने संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ४९ व्या मिनिटाला फ्रेडने गोल करीत संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली तर ८४व्या मिनिटाला फर्नांडीन्होने गोल करीत ब्राझिलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कॅमेरूनकडून मॅटीपने २६ मिनिटाला एकमेव गोल केला. 
दुसरीकडे क्रोएशिया विरूध्द मेक्सिको यांच्यात झालेल्या सामन्यात मेक्सिकोने क्रोएशियाचा ४-१ असा धूव्वा उडवला. मेक्सिकोकडून मॅरक्यूएझने ७२ व्या मिनिटाला, गॉरडॅडोने ७५ व्या, तर  जे. हर्नान्डेजने ८२ व्या मिनिटाला गोल केला. क्रोएशियाकडून पेरेसिकने एकमेव गोल केला. उत्साहपूर्ण चाललेल्या वातावरणात मेक्सिकोने क्रोएशियाचा ३-१ असा पराभव करीत आपला आनंद साजरा केला. 

Web Title: The Brazilian, Mexico's Blown Rivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.