शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षीय मुलीनं जीवाची बाजी लावली अन् नदीत वाहून जाणाऱ्या आईला वाचवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 09:17 IST

आईला नदीतून बाहेर काढण्यासाठी तिने जवळपास २० मिनिटे धडपड केली आणि अखेर आईला गंगा नदीतून बाहेर काढले.

ठळक मुद्देनेपाळी वंशाच्या रामकली देवी आणि तिची 16 वर्षांची मुलगी किरण तपोवनमधील धौली गंगा नदीच्या काठावर लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.रामकली देवी यांना जोशीमठमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वजण किरणच्या या धाडसाचे कौतुक करत आहेत. 

जोशीमठ : गंगा नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या आईला वाचविण्यासाठी एका मुलीने आपल्या जीवाची बाजी लागल्याचे समोर आले आहे. आईला नदीतून बाहेर काढण्यासाठी तिने जवळपास २० मिनिटे धडपड केली आणि अखेर आईला गंगा नदीतून बाहेर काढले.

ही घटना रविवारी घडली. नेपाळी वंशाच्या रामकली देवी आणि तिची 16 वर्षांची मुलगी किरण तपोवनमधील धौली गंगा नदीच्या काठावर लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान, रामकली देवी यांचा पाय घसरुन त्या नदीत पडल्या. त्यानंतर किरणनेही आपल्या जीवाची पर्वा न करता गंगेत उडी मारली. आईला वाचविण्याचे किरणने प्रयत्न सुरु केले आणि अखेर तिने आईला वाचविले.    

प्रत्यक्षदर्शी ओम प्रकाश डोभाल यांनी सांगितले की, यावेळी किरण सुद्धा नदीत वाहता-वाहता वाचली. मात्र, तिने धाडसाने आईला नदीतून बाहेर काढण्यासाठी जवळपास २० मिनिटे धडपड केली आणि अखेर आईला गंगा नदीतून बाहेर काढले.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोक जमा झाले. त्यानंतर जखमी रामकली देवी यांना जोशीमठमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सर्वजण किरणच्या या धाडसाचे कौतुक करत आहेत.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके