शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

खतरनाक! ब्रम्होस जगावर राज्य करणार; जमीन, पाणी, हवा...शत्रूवर कुठूनही वार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 12:05 IST

BrahMos supersonic cruise missile: भारताच्या ताफ्यात एकापेक्षा एक पाणबुड्या आहेत. तसेच या ब्रम्होससाठी अशा पाणबुड्या बनविल्या जात आहेत, ज्यांच्या टॉर्पिडोमध्येही ब्रम्होस मिसाईलचे छोटे व्हर्जन बसविता येणार आहे.

जगातील सर्वात मोठे पायदळ असलेल्या भारतीय सैन्याच्या ताफ्यात एक खतरनाक हत्यार आले आहे. भारताच्या तिन्ही सैन्यदलांकडे अशी मिसाईल आहेत, जी डागल्यास शत्रूला सावध होण्याचा वेळच मिळणार नाही. जेवढ्या वेळात त्यांची डिफेन्स सिस्टिम हा हल्ला रोखण्यासाठी कार्यरत होऊ शकते, तेवढ्या वेळात हे मिसाईल आपले लक्ष्य उद्ध्व्स्त करू शकते. नाव आहे ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल. 

हे मिसाईल जगातील सर्वात वेगवान मिसाईल ठरले आहेत. कारण ब्रम्होस 4300 किमी प्रति तासाच्या प्रचंड वेगाने वार करण्याची क्षमता ठेवते. या आठवड्यात ब्रम्होसच्या अनेक चाचण्या घेण्यात येणार आहेत. आजच अंदमान, निकोबार बेटांवर या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या मिसाईलने एका बेटावरून दुसऱ्या बेटावरील लक्ष्याचा भेद केला आहे. 

हे मिसाईल रशिया आणि भारताच्या संरक्षण संस्थांनी विकसित केले आहे. BrahMos म्हणजे Brah चा अर्थ 'ब्रह्मपुत्रा' आणि Mos चा अर्थ 'मोस्‍कवा'. भारत आणि रशियाच्या दोन मोठ्या नद्यांचे नाव या मिसाईलला ठेवण्यात आले आहे. खरेतर ब्रम्होस मिसाईलचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता जी चाचणी सुरु आहे ती 290 किमी रेंजच्या मिसाईलची सुरु आहे. ही एक नॉन न्युक्लिअर मिसाईल आहे. हे मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने झेपावते. हे मिसाईल सुखोई विमानातूनही डागण्यात येते. 

दुसरे मिसाईल हे 450 किमी लांब लक्ष्यभेद करू शकते. याशिवाय आणखी एक व्हर्जनचे टेस्टिंग सुरु आहे. हे मिसाईल 800 किमीची मारकक्षमता ठेवते. ब्रम्होस मिसाईलची महत्वाची बाब म्हणजे हे मिसाईल पाणी, हवा आणि जमीनीवरूनही मारा करू शकते. या मिसाईलची पहिली चाचणी 2013 मध्ये झाली होती. हे मिसाईल पाण्याच्या 40 ते 50 मीटर आतूनही डागले जाऊ शकते. 

पाणबुड्यांसाठीही तयार करणारभारताच्या ताफ्यात एकापेक्षा एक पाणबुड्या आहेत. तसेच या ब्रम्होससाठी अशा पाणबुड्या बनविल्या जात आहेत, ज्यांच्या टॉर्पिडोमध्येही ब्रम्होस मिसाईलचे छोटे व्हर्जन बसविता येणार आहे. ही मिसाईल जमिनीपासून 5 मीटरचे अंतर ठेवूनही झेपावू शकते. तर अधिकतर 14000 फुटांवरूनही हे मिसाईल लक्ष्यापर्यंत पोहोचू शकते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDRDOडीआरडीओ