शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सुखोई विमानांवरून पहिल्यांदाच होणार ब्राह्मोसची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 10:45 IST

शत्रूराष्ट्राच्या हद्दीत जाऊन विध्वंस घडवण्याची ब्राह्मोसची क्षमता सर्वश्रुत आहे. त्याबरोबरच अत्याधुनिक सुखोई विमाने ही भारताच्या हवाई ताफ्यामधील महत्त्वाचे अस्र आहेत.

नवी दिल्ली - शत्रूराष्ट्राच्या हद्दीत जाऊन विध्वंस घडवण्याची ब्राह्मोसची क्षमता सर्वश्रुत आहे. त्याबरोबरच अत्याधुनिक सुखोई विमाने ही भारताच्या हवाई ताफ्यामधील महत्त्वाचे अस्र आहेत. आता सुखोई विमानाची हल्ला करण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुखोईच्या शस्त्रसाठ्यात ब्राह्मोस क्षेपणास्त्र जोडून शत्रूवर डबल अटॅक करण्याची तयारी संरक्षण यंत्रणांनी केली आहे. त्यानुसार पहिल्यांदाच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई विमानांवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात येणार आहे. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची या आठवड्यात पहिल्यांदाच सुखोई एमकेआय- 30 फायटर विमानावरून चाचणी होणार आहे. लढाऊ विमानावरून हल्ला करण्यास सक्षम असलेले ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि सुखोई एमेआय फायटर जेटच्या या कॉम्बिनेशनकडे डेडल कॉम्बिनेशन म्हणून पाहिले जात आहे. हवेतून जमिनीवर मारा करता येणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा शत्रू सैन्याच्या सीमेवरील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी वापर करता येऊ शकेल. ब्राह्मोस क्षेपणास्र भूमिगत परमाणू बंकर, कमांड आणि नियंत्रण कक्ष तसेच समुद्रावरून उडणारी विमाने यांना लक्ष्य करता येऊ शकेल. गेल्या दशकात लष्कराने 290 किमी पर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राला आपल्या ताफ्यात सामील केले होते. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी 27 हजार 150 कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच लष्कर, नौदल, आणि हवाई दलाने या क्षेपणास्त्रांबाबत रस दाखवला आहे.   जून 2016 मध्ये भारत 34 देशांची संघटना असलेल्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिझिम या संघटनेचा सदस्य बनल्यापासून क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेवरील निर्बंध उठले आहे.  त्यामुळे सुरक्षा दले आता ब्राह्मोसच्या 450 किमीपर्यंत मारक क्षमता असलेल्या आवृत्तीची चाचणी करण्याच्या तयारीत आहेत. एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाल्यानंतर भारत 300 किमी मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यास सक्षम होईल. सध्यातरी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे हायपरसोनिक व्हर्जन तयार कण्याची तयारी सुरू आहे. हे क्षेपणास्त्र माक 5 (ध्वनीच्या पाच पट वेगाने) वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असेल.  

टॅग्स :Indiaभारत