ब्राह्मण समाजच भारतीय संस्कृतीचे रक्षण करु शकतो - अग्रवाल

By Admin | Updated: December 1, 2014 13:52 IST2014-12-01T13:43:42+5:302014-12-01T13:52:14+5:30

भारतीय संस्कृतीचे रक्षण फक्त ब्राह्मण समाजच करु शकते असे विधान छत्तीसगडचे कृषी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी केले आहे.

Brahmin society can protect Indian culture - Agrawal | ब्राह्मण समाजच भारतीय संस्कृतीचे रक्षण करु शकतो - अग्रवाल

ब्राह्मण समाजच भारतीय संस्कृतीचे रक्षण करु शकतो - अग्रवाल

ऑनलाइन लोकमत 

रायपूर, दि. १ - भारतीय संस्कृतीचे रक्षण फक्त ब्राह्मण समाजच करु शकतो असे विधान छत्तीसगडचे कृषी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी केले आहे. आपली संस्कृती, परंपरेचा -हास होत असून आता फक्त ब्राह्मण समाजच हे थांबवू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. 
रायपूरमधील एका कार्यक्रमात ब्रिजमोहन अग्रवाल यांनी ब्राह्मणप्रेम दाखवून दिले. ब्राह्मण हे भारतीय संस्कृतीचे एकमेवर रक्षक आहेत असे अग्रवाल यांचे म्हणणे आहे. प्रत्येक सुजाण व्यक्तीला हे माहित आहे की ब्राह्मण समाजच भारतीय परंपरा व संस्कृतीचा वारसा पुढे नेईल अशी पुस्तीही त्यांनी जोडली. धर्म आणि राजकारणाची सांगड घालत अग्रवाल म्हणाले, सत्तास्थापनेत आपण धर्म डोळ्यासमोर ठेऊनच चालले पाहिजे. अग्रवाल यांचे जातीयवादी विधान वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: Brahmin society can protect Indian culture - Agrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.