गंगेच्या पाण्यात ब्रम्हतत्वांचा शोध.. जोड

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:34+5:302015-08-26T23:32:34+5:30

-गंगेतील औषधीतत्त्वे

Brahmacharya search in Ganges water | गंगेच्या पाण्यात ब्रम्हतत्वांचा शोध.. जोड

गंगेच्या पाण्यात ब्रम्हतत्वांचा शोध.. जोड

-ग
ंगेतील औषधीतत्त्वे
गंगेच्या उगमस्थानापासून नदीपात्रात असलेल्या वनस्पती व जडीबुटी या औषधीतत्त्वांचाच भाग आहेत. या जडीबुटींचे तत्त्वांचा पाण्यात समावेश होतो. सजिवांना फायदेशीर असणाऱ्या बॅक्टेरियोफॉजचे प्रमाण गंगाजळात अधिक असल्याचे समजते. हे बॅक्टेरियोफॉज पाण्यातील इतर नुकसानकारक बॅक्टेरियांसाठी घातक आहे. याचे प्रमाण सध्या किती आहे, नदीपात्राच्या कोणत्या भागात याचे प्रमाण अधिक आहे व कोणत्या भागात प्रमाण कमी आहे याची पाहणी करण्यात येत आहे. शिवाय जैविक तत्त्व, माणसाच्या त्वचेच्या आजारावर फायदेशीर असणारे सल्फर कम्पाउंड व इतर औषधीतत्वांच्या संशोधनावर भर दिल्या जात आहे.
चौकट...
गंगा सफाईचा केंद्रबिंदू
प्रदूषणामुळे या औषधीयुक्त ब्रह्मतत्त्वांची हानी झाले असेल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. विशेषत: शहरी वस्ती, नाल्यांमुळे येणारे प्रदूषण व कारखाने असलेल्या भागात ही शक्यता अधिक आहे. गंगेच्या पात्रातील ज्या भागात या तत्त्वांचे प्रमाण कमी आढळून येईल त्या भागाच्या सफाईवर अधिक भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Brahmacharya search in Ganges water