शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:16 IST

High Court Live In Relationship: लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना मध्यमवर्गीय समाजाच्या सध्या असलेल्या नियमांच्या विरोधात आहे, मात्र यामुळे महिलांचे अगणित नुकसान होत आहे.

प्रयागराज : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेचे शारीरिक शोषण केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना मध्यमवर्गीय समाजाच्या सध्या असलेल्या नियमांच्या विरोधात आहे, मात्र यामुळे महिलांचे अगणित नुकसान होते, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय, अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

न्यायाधीश सिद्धार्थ यांनी या प्रकरणी सुनावणी केली. त्यांच्यासमोर शान-ए-आलमच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या अनेक तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. 

लग्नाचे आश्वासन देऊन त्याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. २५ फेब्रुवारीपासून आरोपी तुरुंगात असल्याने, त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

तरुण पिढीवर मोठा परिणाम, दुष्परिणाम दिसताहेत

वकिलाने न्यायालयाला सांगितले की, आरोपीच्या कृतींमुळे महिलेचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि आता कोणीही तिच्याशी लग्न करण्यास तयार होणार नाही. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हटले की लिव्ह-इन रिलेशनशिपचा सर्वात जास्त परिणाम तरुण पिढीवर झाला आहे आणि त्याचे दुष्परिणाम सध्याच्या प्रकरणांमध्ये दिसून येतात.

न्यायालयाने काय म्हटले? 

सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर, असे अनेक खटले न्यायालयात येत आहेत. 

लिव्ह-इन रिलेशनशिप भारतीय मध्यमवर्गाच्या सध्याच्या कायद्यांच्या विरुद्ध असल्याने असे खटले येत आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 

असे संबंध संपल्यावर पुरुष पुढे जातात आणि लग्न करतात, ब्रेकअपनंतर महिलांना जोडीदार शोधणे कठीण जाते.

तुरुंगात गर्दीमुळे जामीन

कोणताही जुना गुन्हेगारी खटला नसल्यामुळे, आरोपांचे स्वरूप आणि तुरुंगात गर्दी असल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टHigh Courtउच्च न्यायालय