नवी दिल्ली- तीन वर्षांचा मुलगा विमानात रडू लागला म्हणून एका भारतीय अधिकाऱ्याच्या कुटुंबास ब्रिटिश एअरवेजने उतरवल्याची घटना घडली आहे. 23 जुलै रोजी ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे..ए. पी. पाठक असे या सनदी अधिकाऱ्यांचे नाव असून त्यांचे कुटुंब लंडन ते बर्लिन असा ब्रिटिश एअरवेजमधून प्रवास करत होते. या घटनेची माहिती देताना पाठक म्हणाले, 'आम्ही प्रवास करत असताना आमचा तीन वर्षांचा मुलगा रडू लागला, फ्लाइट अटेंडंटने त्याला थांबायला सांगितले आणि जर रडणे थांबवले नाही तर विमानातून उतरवू अशी धमकी दिली. काहीवेळ तो शांत झालेला नसल्याचे लक्षात आल्यावर आम्हाला विमानातून उतरवले गेले.'
मुलगा रडू लागला म्हणून भारतीय अधिकाऱ्याच्या कुटुंबास विमानातून उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 14:48 IST