वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने इमामाला भोसकले
By Admin | Updated: July 15, 2016 15:44 IST2016-07-15T15:44:02+5:302016-07-15T15:44:02+5:30
वडिलांचा अपमान केला म्हणून अल्पवयीन मुलाने मशिदीतल्या इमामाला भोसकले. उत्तरप्रदेशातल्या नवाबगंजमध्ये बुधवारी ही घटना घडली.

वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने इमामाला भोसकले
ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. १५ - वडिलांचा अपमान केला म्हणून अल्पवयीन मुलाने मशिदीतल्या इमामाला भोसकले. उत्तरप्रदेशातल्या नवाबगंजमध्ये बुधवारी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, तो नवव्या इयत्तेत आहे. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडिलांच्या चिथावणीवरुन मुलाने हल्ला केल्याचे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इमामाने सांगितले. मुलाचे पिता छोटान फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
इमाम जाहीरपणे आपल्या वडिलांचा पाणउतारा करत आहे हे पाहिल्यानंतर मुलाला संताप आला व त्याने थेट इमामावर हल्ला केला असे पोलिसांनी सांगितले.