बॉक्सर निवड

By Admin | Updated: August 26, 2015 00:19 IST2015-08-26T00:19:04+5:302015-08-26T00:19:04+5:30

१६ वर्षांचा बॉक्सर

Boxer selection | बॉक्सर निवड

बॉक्सर निवड

वर्षांचा बॉक्सर
विश्व स्पर्धेत खेळणार
नवी दिल्ली : १६ वर्षांचा युवा बॉक्सर हर्षप्रीत सहरावत हा २ ते १३ सप्टेंबरदरम्यान सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित विश्व ज्युनियर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. दिल्ली हायकोर्टाने त्याला संघात खेळण्याची परवानगी बहाल केली.
८० वर्षे वजन गटात आपल्यापेक्षा अधिक वयाच्या खेळाडूंना नमवीत तो राष्ट्रीय चॅम्पियन बनला. वजन आणि कतृर्त्व असताना निवड समितीने भारतीय संघात स्थान नाकारल्याने त्याचे वडील न्यायालयात गेले होते.
न्या. व्ही.पी. वैश्य यांनी संबंधित अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेला निर्देश देत तीन दिवसात हर्षप्रीतची संघात निवड झाल्याची खात्री करा, शिवाय त्याला परदेशात पाठविण्यासंबंधी कुटुंबीयांना व वकिलास कळविण्यास सांगितले आहे. या मुलाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यास कुठलेही अडथळे येऊ नये याची खब्रदारी घेण्याचे आदेश न्यायालयाने साईला दिले. १३ वर्षांचा हर्षप्रीत १७ वर्षे गटात खेळला व सुवर्णपदक जिंकले होते. त्याने १४,१५ आणि १९ वर्षे गटाचेही सुवर्णपदक जिंकले, हे विशेष. (वृत्तसंस्था)

Web Title: Boxer selection