शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Boxer Death Bangalore: एका ठोशाने घेतला जीव; बॉक्सिंग मॅचदरम्यान 23 वर्षीय खेळाडूचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 14:31 IST

Boxing Competition: बंगळुरुमध्ये बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यादरम्यान एका 23 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू झाला.

Boxer Death in Banglore: जगभरात अनेक ठिकाणी बॉक्सिंक स्पर्धेचे आयोजन केले जाते. बॉक्सिंग हा जितका मनोरंजक वाटतो, तितकाच धोकादायक खेळ आहे. यात खेळाडूंना गंभीर इजा होते, अनेकदा मृत्यूही झाल्याच्या बातम्या समोर येतात. पाश्चिमात्य देशांमध्ये या खेळाचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. दरम्यान, बंगळुरुमध्ये बॉक्सिंग सामन्यात एका बॉक्सरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान अपघात बंगळुरुमध्ये किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एका 23 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू झाला आहे. बॉक्सर दोन दिवस कोमात राहिला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी खेळाडूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 10 जुलै रोजी घडली. 

दोन दिवस कोमातबंगळुरुच्या जनभारती पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एका सामन्यात नवीन आणि निखिल नावाचे खेळाडू एकमेकांसोबत बॉक्सिंग करत होते, यादरम्यान निखिल नवीनच्या एका जोरदार ठोशात जमिनीवर कोसळला. अनेक प्रयत्न करूनही निखिलला जाग आली नाही तेव्हा त्याला रुग्णालयात नेले. दोन दिवस तो कोमात राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा या प्रकरणी आता बंगळुरू पोलिसांनी आयोजक आणि प्रतिस्पर्धी खेळाडू नवीनविरुद्ध आयपीसीच्या कलम 304 ए अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. म्हैसूरच्या या खेळाडूने अल्पावधीतच किक बॉक्सिंगमध्ये चांगले नाव कमावले होते. निखिलचे वडीलही कराटे खेळाडू आहेत. दरम्यान, निखिलच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकbangalore-central-pcबंगलोर सेंट्रलboxingबॉक्सिंगDeathमृत्यू