आपच्या दोन्ही आमदारांना अटक, केजरीवालांच्या सल्लागाराचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:04 AM2018-02-22T05:04:46+5:302018-02-22T05:04:58+5:30

दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणप्रकरणी आपच्या अमानतुल्ला खान व प्रकाश जरवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Both of you arrested the MLA, consulted Kejriwal's advisory | आपच्या दोन्ही आमदारांना अटक, केजरीवालांच्या सल्लागाराचीही चौकशी

आपच्या दोन्ही आमदारांना अटक, केजरीवालांच्या सल्लागाराचीही चौकशी

Next

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणप्रकरणी आपच्या अमानतुल्ला खान व प्रकाश जरवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. केजरीवाल यांचे सल्लागार व्ही. के. जैन यांचीही पोलिसांनी तीन तास चौकशी केली.
आ. जरवाल यांना मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली. अमानतुल्ला खान हे बुधवारी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक झाली. मुख्य सचिवांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सोमवारीबैठकीला उपस्थित असताना आ. खान व जरवाल यांनी मला मारहाण केली. त्यांच्या आरोपाचा आपने इन्कार केला होता.
या मारहाणीनंतर राजधानीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागविला. दिल्लीच्या सचिवालयातील लिफ्टच्या दरवाजाबाहेर पर्यावरणमंत्री इम्रान हुसैन यांना मंगळवारी काहींनी धक्काबुक्की केली. त्यांच्या सहाय्यकालाही मारहाण झाली. मुख्य सचिवांना झालेल्या मारहाणीचा सनदी अधिकाºयांनी काळ््या फिती लावून निषेध केला.

Web Title: Both of you arrested the MLA, consulted Kejriwal's advisory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.