एसटी चालकाकडून लाच घेताना दोघे अटकेत

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:17+5:302015-02-11T00:33:17+5:30

एसटी चालकाकडून लाच घेताना दोघे अटकेत

Both of them were arrested for taking bribe from ST driver | एसटी चालकाकडून लाच घेताना दोघे अटकेत

एसटी चालकाकडून लाच घेताना दोघे अटकेत

टी चालकाकडून लाच घेताना दोघे अटकेत
रंगेहात पकडले : कार्यालयीन चौकशी थांबविण्यासाठी मागितली रक्कम
नागपूर : अपघाताची कार्यालयीन चौकशी थांबवून शिक्षा न करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारणाऱ्या सेवानिवृत्त सहायक वाहतूक निरीक्षक आणि एसटी चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास रंगेहात अटक केली आहे.
अक्रम खान मुस्तफा खान पठाण (५५,) रा. खंडाळा डुमरी पारशिवनी हे एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत आहेत. ड्युटीवर त्यांच्याकडून अपघात झाल्यामुळे त्यांची कार्यालयीन चौकशी सुरू होती. दरम्यान सेवानिवृत्त सहायक वाहतूक निरीक्षक अरुण गोविंद सांगळे हे या प्रकरणाची चौकशी करीत होते. सीबीएस १ येथील एसटीचा चालक हुसेन मोहम्मद मालाधारी (५३) याने सांगळे यांच्यावतीने अक्रम खान मुस्तफा खान पठाण यांना कार्यालयीन चौकशी थांबवून बरखास्तीची कारवाई टाळण्यासाठी १.५० लाखाच्या रकमेची मागणी केली. दरम्यान ही रक्कम देण्याची अक्रम खान मुस्तफा खान पठाण यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. विभागाने सापळा रचून दीड लाखाच्या रकमेऐवजी १ लाख ५ हजार देण्याचे ठरविले. मंगळवारी चौकशी अधिकारी अरुण गोविंद सांगळे आणि एसटी चालक हुसेन मोहम्मद मालाधारी यांना मोक्षधामजवळील एसटी कर्मचारी वसाहतीत लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them were arrested for taking bribe from ST driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.