दोघांनी लावला गळफास

By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:03+5:302015-08-14T23:35:03+5:30

Both of them slapped on | दोघांनी लावला गळफास

दोघांनी लावला गळफास

>नागपूर : उपराजधानीतील वेगवेगळ्या भागात दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. तर, एकाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. हसनबाग येथे राहणारे प्यारेलाल हमीद खान पठाण (वय ४७) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ६.३० ला ही घटना उघडकीस आली. अस्मान खान प्यारे खान (वय १६) याने दिलेल्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली
अशाच प्रकारे जरीपटक्यातील चॉक्स कॉलनी, दुर्गे आटा चक्कीजवळ राहणारा रंजीतसिंग हरिसिंग भामरा (वय २८) याने शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
विष प्राशन करून आत्महत्या
सुराबर्डी, वडधामना येथील गजानन तुळशीराम गाडीमोने (वय ५६) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, गाडीमोनेच्या आत्महत्येमागचे कारण शोधले जात आहे.
---
विहिरीत आढळला मृतदेह
नागपूर : गिट्टीखदानमधील वीरचक्र कॉलनीत राहणारे प्रशांत पांडुरंगजी आगलावे (वय ४३) यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ११.०९ वाजता विहिरीत आढळला. विनोद पांडुरंगजी आगलावे (वय ३३) यांच्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---

Web Title: Both of them slapped on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.