दोघांचा आजन्म कारावास रद्द
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:57+5:302015-02-18T00:12:57+5:30
हायकोर्ट : प्लॉट हडपण्यासाठी एकाची हत्या

दोघांचा आजन्म कारावास रद्द
ह यकोर्ट : प्लॉट हडपण्यासाठी एकाची हत्यानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती येथील हत्याप्रकरणात दोन आरोपींची आजन्म कारावासाची शिक्षा रद्द केली आहे. अनिल बबनराव पटवर्धन (३६), रा. चांदूर रेल्वे (अमरावती) व दादाराव हरिदास इंदुरकर (३७), रा. खडकी (अकोला) अशी आरोपींची नावे आहेत. मृताचे नाव प्रेमकुमार जोशी होते. ५ नोव्हेंबर २००७ रोजी कान्हा अपार्टमेंटमध्ये आरोपींनी जोशी यांना हात-पाय दोरखंडाने बांधून जाळल्याचा आरोप होता. आरोपींनी सात हजार चौरस फुटाचा प्लॉट हडपण्यासाठी हे कृत्य केल्याचे जोशी यांनी मृत्यूपूर्व बयानात सांगितले होते. १७ ऑगस्ट २०१० रोजी अमरावती सत्र न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आजन्म कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील स्वीकारून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. अमरावती येथील राजापेठ पोलिसांनी घटनेचा तपास केला होता.