लाचखोर तलाठ्यासह दोघांना जामीन

By Admin | Updated: February 19, 2016 22:26 IST2016-02-19T22:26:16+5:302016-02-19T22:26:16+5:30

जळगाव : सातबारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणारे पिंप्राळा सजाचे तलाठी सत्यजित अशोक नेमाने व त्यांचे हस्तक सेवानिवृत कोतवाल उखर्डू पांडू सोनवणे या दोघांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Both of them have been arrested along with bribe money | लाचखोर तलाठ्यासह दोघांना जामीन

लाचखोर तलाठ्यासह दोघांना जामीन

गाव : सातबारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणारे पिंप्राळा सजाचे तलाठी सत्यजित अशोक नेमाने व त्यांचे हस्तक सेवानिवृत कोतवाल उखर्डू पांडू सोनवणे या दोघांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
लाच घेतल्याप्रकरणी दोघांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली होती. अटकेनंतर त्यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोघांना पोलिसांनी न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सुरुवातीला त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर दोघांनी जामिनासाठी अर्ज दिला. तो न्यायालयाने मंजूर केल्याने त्यांची सुटका झाली. सरकारतर्फे ॲड.भारती खडसे यांनी तर आरोपींतर्फे ॲड.आर.के. पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: Both of them have been arrested along with bribe money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.