चिमुकल्यासह दोघे बेपत्ता
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:45+5:302015-01-23T01:05:45+5:30
नागपूर : लकडगंजमधील सहा वर्षीय बालकासह दोघे बेपत्ता झाले. भावेश दीपक गडपायले (वय ६) असे बेपत्ता बालकाचे नाव आहे.

चिमुकल्यासह दोघे बेपत्ता
न गपूर : लकडगंजमधील सहा वर्षीय बालकासह दोघे बेपत्ता झाले. भावेश दीपक गडपायले (वय ६) असे बेपत्ता बालकाचे नाव आहे. शांतिनगर, मुदलियार लॉनच्या मागे राहणारे दीपक गडपायले यांचा मुलगा भावेश (वय ६) हा मंगळवारी दुपारी १२.३० वाजता बाजूच्या बगिच्यात खेळायला गेला. रात्रीपर्यंत परत न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली. शेवटी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, भावेश तसेच त्याला पळवून नेणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. अशाच प्रकारे यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवेशनगरात राहणारी १७ वर्षीय मुलगी मामांच्या घरी जातो, असे सांगून बुधवारी सकाळी १०.३० वाजता घरून निघून गेली. ती रात्र झाली तरी घरी परतली नाही. चौकशी केली असता ती मामांच्या घरीसुद्धा पोहचली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे तिच्या पालकांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ----