शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:16 IST

Air India Plane Crash: जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत. 

एअर इंडियाच्या विमान अपघातात २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात विमानातून प्रवास करणारे सर्वच्या सर्व कुटुंब देखील संपले आहे. यामुळे विमा कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण विमाधारकासोबत त्यांनी दिलेल्या नॉमिनींचा देखील यात मृत्यू झाला आहे. यामुळे अशावेळी निर्माण होणारी गुंतागुंत कशी सोडवायची याच्या विवंचनेत या विमा कंपन्या आहेत. 

अहमदाबाद विमानतळाबाहेर झालेल्या या विमान अपघातात विमानातील २४१ तर घटनास्थळावरील २९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६० परदेशी नागरिक आहेत. परंतू, जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत. 

इरडाने विमा कंपन्यांना या मृतांची नावे आपल्या डेटाशी जुळवून विम्याची रक्कम लगेचच द्यावी असे आदेश दिले आहेत. विमा कंपन्या देखील तयार आहेत परंतू त्यांच्यासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. कारण या अपघातात पतीची विमा पॉलिसी असेल तर त्याची नॉमिनी पत्नी देखील मृत झालेली आहे. तसेच काहींची पत्नी व मुले देखील मृत झालेली आहेत. अशावेळी एक दीर्घ प्रक्रिया करावी लागणार आहे. ज्यामुळे विमा क्लेम सेटलमेंटला वेळ लागण्याची शक्यता आहे. 

एलआयसीचे अधिकारी आशिष शुक्ला यांच्यानुसार कंपनीला आतापर्यंत १० दावे प्राप्त झाले आहेत. त्यात असा एक दावा आहे ज्यात नॉमिनी असलेल्या पत्नीचाही मृत्यू झालेला आहे. जर विमाधारक आणि नॉमिनी या दोघांचाही मृत्यू झाला असेल, तर आम्ही 'क्लास वन' वारसांची तपासणी करतो, जसे की त्यांची मुले. जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर प्रत्येकाने परस्पर संमती पत्र द्यावे लागते आणि कंपनीला नुकसानभरपाईचा बाँड सादर करावा लागतो. 

अशाच प्रकारचा दावा इफ्को टोकियो, टाटा एआयजीला देखील मिळाला आहे. या कंपन्यांना इरडाचे स्पष्ट आदेश आहेत. कोणाचा दावा फेटाळायचा नाहीय की विलंबही करायचा नाहीय. यामुळे सर्वच विमा कंपन्यांनी अहमदाबादमध्ये हेल्प सेंटर उघडले आहेत. त्याद्वारे हे विम्याचे दावे सोडविले जात आहेत. परंतू, ही प्रक्रिया पार पाडायची असेल तर काही दाव्यांना विलंब होणार आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद