अपघातात दोघे गंभीर

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:33+5:302015-07-10T23:13:33+5:30

बार्शी : बार्शी-जामगाव (आ.) या बा‘वळणावरील रस्त्यावर समोरून येणार्‍या दुचाकीला कारने धडक दिल्याने दुचाकीवरील बाळासाहेब नागनाथ अंकुश (५५) व त्यांचा मुलगा कार्तिक अंकुश (वय १२, रा़ घाटंग्री ता. उस्मानाबाद) हे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास बी. आय. टी. इंजिनियरिंग महाविद्यालय ते जामगाव दरम्यान घडली.

Both are serious in the accident | अपघातात दोघे गंभीर

अपघातात दोघे गंभीर

र्शी : बार्शी-जामगाव (आ.) या बा‘वळणावरील रस्त्यावर समोरून येणार्‍या दुचाकीला कारने धडक दिल्याने दुचाकीवरील बाळासाहेब नागनाथ अंकुश (५५) व त्यांचा मुलगा कार्तिक अंकुश (वय १२, रा़ घाटंग्री ता. उस्मानाबाद) हे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास बी. आय. टी. इंजिनियरिंग महाविद्यालय ते जामगाव दरम्यान घडली.
जखमी एमएच.२५ एक्स ५८०० या दुचाकीवरून पंढरपूर येथील आळंदीहून निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात असतानाच समोरून चुकीच्या दिशेने येणार्‍या एमएच.२४-९६६६ या कारचा चालक चांदणी येथून लातूरकडे जाताना धडक दिल्याने हा अपघात झाला. दुसर्‍या मोटरसायकलवरील जखमींच्या सोबत आलेले सतीश देडे व सागर देडे यांनी डॉ. रणजित काकडे यांना माहिती दिल्याने जखमींना बार्शीत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: Both are serious in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.