बोपय्या यांची पहिल्यांदा परीक्षा, हंगामी अध्यक्षपदी नियुक्तीस आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 06:45 IST2018-05-19T06:45:01+5:302018-05-19T06:45:01+5:30
भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांची राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीला काँग्रेस व जनता दलाने आक्षेप घेतला आहे.

बोपय्या यांची पहिल्यांदा परीक्षा, हंगामी अध्यक्षपदी नियुक्तीस आक्षेप
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांची राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीला काँग्रेस व जनता दलाने आक्षेप घेतला आहे. या नियुक्तीला विरोध करण्यासाठी दोन्ही पक्षांनी सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शनिवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे.
>सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
बोपय्या भाजपातर्फे विधानसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. ते २००९ ते २०१३ या काळात कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष होते. आॅक्टोबर २०११ मध्ये सत्ताधारी भाजपामधील ११ असंतुष्ट आमदार व काही अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात बंड करून, पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते. मात्र अध्यक्ष बोपय्या यांनी या आमदारांना अपात्र ठरवल्याने येडियुरप्पा यांचे सरकार वाचले. सर्वोच्च न्यायालयाने बोपय्या यांचा निर्णय रद्द करून त्यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी या आमदारांना अपात्र ठरवण्यात घाई केल्याबद्दल त्यांच्यावर ताशेरे ओढले होते, याचा उल्लेख करीत दोन्ही पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.