शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

भारत जोडाेचा बूस्टर डोस! विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कसोटी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 06:22 IST

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी वेळोवेळी ही निवडणूक यात्रा नसून विचारधारेची यात्रा असल्याचे म्हटले होते.

नवी दिल्ली/जयपूर/भोपाळ : काँग्रेसने भारत जोडो यात्रेचे वर्णन ‘बूस्टर डोस’ असे केले आहे; परंतु, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या विधानसभा निवडणुका  होणाऱ्या राज्यांत ही यात्रा पक्षाला नवजीवन देण्यात यशस्वी हाेईल का, याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी वेळोवेळी ही निवडणूक यात्रा नसून विचारधारेची यात्रा असल्याचे म्हटले होते. असे असले तरी राजकीय पंडितांचे म्हणणे आहे की, तिची खरी कसोटी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान लागेल. या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यातील कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांमधून ही यात्रा गेली.

राजस्थानचा प्रश्न कायम- कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला या यात्रेने थोडाफार फायदा झाल्याचे दिसते; परंतु, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या छावणीतील गटबाजी भारत जोडो यात्रेपुरती थंडावली होती, त्यानंतर ती सुरूच असल्याचे चित्र आहे. - पायलट गटाकडून त्यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. काँग्रेसला राज्यात पुन्हा सत्तेत यायचे असेल तर गेहलोत- पायलट प्रश्न सोडवावा लागेल, अन्यथा यात्रेचा फायदा शून्य ठरेल, असे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

संघटनात्मक ऐक्य महत्त्वाचेकन्याकुमारी ते काश्मीर या चार हजार किमीपेक्षा जास्त अंतराच्या या यात्रेने या राज्यांतील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच उत्साह आणला आहे; पण त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल की नाही हे संबंधित राज्य काँग्रेस पाठपुरावा ठेवू शकते का, यावर अवलंबून असेल. तसेच, पारंपरिकपणे गटबाजीने ग्रासलेल्या राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा यांसारख्या राज्यांमध्ये संघटनात्मक ऐक्य हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. 

भाजप देणार ‘शेतकरी यात्रे’ने उत्तर- आगामी विधानसभा आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण केलेल्या काँग्रेसकडून सध्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू असताना, आता भाजपने २४ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय घोषणांच्या व्यापक प्रचारासाठी एक लाख गावांमध्ये पदयात्रा काढून, एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.- भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर म्हणाले, अर्थसंकल्पातील घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान देशभरात ‘शेतकरी चावडी’चे आयोजन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPunjabपंजाब