नागपूरसह काही शहरांत उबरची बुकींग इंटरनेटवर
By Admin | Updated: August 16, 2016 18:54 IST2016-08-16T18:54:37+5:302016-08-16T18:54:37+5:30
अॅपच्या माध्यमातून टॅक्सी सेवा देणा-या सॅन फ्रॅन्सिस्को स्थित उबर कंपनीने आता ग्राहकांसाठी टॅक्सी सेवा नागपूरसह देशातील चार शहरामध्ये इंटरनेटवरच्या माध्यमातून सुरु केली आहे.

नागपूरसह काही शहरांत उबरची बुकींग इंटरनेटवर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - अॅपच्या माध्यमातून टॅक्सी सेवा देणा-या सॅन फ्रॅन्सिस्को स्थित उबर कंपनीने आता ग्राहकांसाठी टॅक्सी सेवा नागपूरसह देशातील चार शहरामध्ये इंटरनेटवरच्या माध्यमातून सुरु केली आहे.
देशातील नागपूर, कोची, गुवाहटी आणि जोधपूरमध्ये इंटरनेटवरच्या माध्यमातून टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली असून यासाठी इंटरनेटवर क्रोम, यूसीवेब, सफारी आणि ओपेरा या ब्रॉऊजरने ग्राहकांना उबर टॅक्सीचे बुकींग करता येणार आहे.
आम्ही विनंतीनुसार उबरची सर्व्हिस सोपी बनवत आहोत. आता तुमच्या मोबाईलवर अॅप असो किंवा नसो ग्राहक थेट वेब ब्राऊजरच्या माध्यमातून उबरची बुकींग करु शकतात. यासाठी ग्राहकांनी त्यांच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून dial.uber.com वर लॉग ऑन केल्यास नागपूर, कोची, गुवाहटी आणि जोधपूरमध्ये टॅक्सी सेवा मिळू शकेल. तसेच, यासाठी ऑनलाइनच पेमेंन्ट करण्याची सोय करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.