शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:57 IST

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नव्या पुस्तकातील दावा

नवी दिल्ली : माझी राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली, असा खळबळजनक दावा दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल ईअर्स’ या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाला सोनिया गांधीमनमोहन सिंग हेच जबाबदार असल्याचेही मुखर्जी यांनी म्हटले आहे.रूपा पब्लिकेशनतर्फे हे नवे पुस्तक जानेवारी महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्या पुस्तकात मुखर्जी यांनी म्हटले आहे की, २००४ साली जर माझ्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपविली असती तर २०१४ साली काँग्रेसला पराभव पत्करावा लागला नसता असे त्या पक्षातील काही नेत्यांचे मत होते. मी मनमोहन सिंग यांच्यापेक्षा अधिक उत्तम पंतप्रधान होऊ शकलो असतो, असे मुखर्जी यांनी या पुस्तकात सुचविले आहे. प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान व त्यांच्या कारभाराचे प्रतिबिंब देशाच्या स्थितीत उमटते. मनमोहन सिंग हे आघाडी वाचविण्यात मश्गुल होते व त्याचा परिणाम कारभारावर झाला. सोनिया गांधी काँग्रेस पक्षाचा कारभार हाकण्यास असमर्थ ठरत होत्या तर मनमोहन सिंग यांच्या संसदेतील मोठ्या अनुपस्थितीमुळे त्यांचा खासदारांशी व्यक्तिगत संपर्कही फारसा राहिला नाही. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१५ साली केलेल्या भारत दौऱ्याच्या आठवणीही प्रणब मुखर्जी यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत.मोदींचा कारभार काहीसा हुकूमशाही पद्धतीचाप्रणब मुखर्जी यांनी नव्या पुस्तकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात काहीशा हुकूमशाही पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या परिणामी सरकार, विधिमंडळ, न्याययंत्रणा यांच्यातील संबंध ताणले गेले. अशा गोष्टींबाबत पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळात सामंजस्याची भूमिका घेतली आहे का, याचे उत्तर येणारा काळच देईल. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी