्रचला आला ग्रंथ मेळा; वाचक करू गोळा

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:34+5:302015-02-18T00:13:34+5:30

नाशिक : कोणे एके काळी दिल्लीच्या पुस्तक मेळाच्या धर्तीवर नाशिकमध्ये गं्रथयात्रा भरविण्यात आली होती, त्याच नगरीत आता वर्षानुवर्षे व्यावसायिक स्तरावर ग्रंथप्रदर्शन भरविले जाते आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असताना शासकीय यंत्रणांना मात्र सूर गवसला नाही. शहराच्या एका कोपर्‍यात भरविलेल्या ग्रंथप्रदर्शनाला ना स्टॉलधारकांचा प्रतिसाद ना वाचकांचा. परिणामी ग्रंथोत्सवावर खर्च तर खूपच झाला, परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षकांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सार्‍या वाचकांना (?) सक्तीने गोळा करण्यात येत आहे.

The Book Fair is organized; Let's do the reader | ्रचला आला ग्रंथ मेळा; वाचक करू गोळा

्रचला आला ग्रंथ मेळा; वाचक करू गोळा

शिक : कोणे एके काळी दिल्लीच्या पुस्तक मेळाच्या धर्तीवर नाशिकमध्ये गं्रथयात्रा भरविण्यात आली होती, त्याच नगरीत आता वर्षानुवर्षे व्यावसायिक स्तरावर ग्रंथप्रदर्शन भरविले जाते आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असताना शासकीय यंत्रणांना मात्र सूर गवसला नाही. शहराच्या एका कोपर्‍यात भरविलेल्या ग्रंथप्रदर्शनाला ना स्टॉलधारकांचा प्रतिसाद ना वाचकांचा. परिणामी ग्रंथोत्सवावर खर्च तर खूपच झाला, परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षकांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सार्‍या वाचकांना (?) सक्तीने गोळा करण्यात येत आहे.
नाशिक तसे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर मानले जात असल्याने येथे ना रसिकांचा तोटा ना चोखंदळ वाचकांचा. त्यामुळेच पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेले सार्वजनिक वाचनालय असतानादेखील शहरात अनेक ग्रंथ मंदिरे उभी आहेत. इतकेच नव्हे तर व्यावसायिक कारणामुळे भरणार्‍या ग्रंथप्रदर्शनांनादेखील प्रतिसाद मिळत असल्याने सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीत कायमस्वरूपी भाड्याने ग्रंथप्रदर्शन सुरू असतात. त्यामुळे नाशिकमध्ये तशी वाचकांची कमतरता नसताना शासकीय पातळीवर भरविण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाला अवकळा आली आणि अक्षरश: अनेक स्टॉल रिक्त झाले. गेल्या सोमवारी पंचवटीत श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या ग्रंथप्रदर्शनात १५ स्टॉल असतील असे सांगण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात सात ते आठ स्टॉल त्यातही मंगळवारी केवळ चार स्टॉल खुले ठेवण्यात आले होते. शासकीय स्टॉलवर दर्जेदार पुस्तके माफक दरात उपलब्ध असताना त्यात कोणतेही चर्चेतील पुस्तके एकतर आणलेलीच नाही अन्यथा आउट ऑफ प्रिंट. अशा स्थितीत वाचक गावाच्या एका कोपर्‍यात जाण्याचे कष्ट कसे घेणार? त्यामुळेच की काय आता सक्तीने वाचक आणि ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांसाठी प्रेक्षक गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या दिवशी शिक्षक, दुसर्‍या दिवशी (मंगळवारी) मुख्याध्यापक आणि आता बुधवारी सर्व शाळांमधील ग्रंथपालांना हजर राहणे सक्तीचे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाची अशी अवस्था असेल तर त्यासाठी राज्यशासनाने त्यासाठी माहिती कार्यालय आणि संबंधित विभागाला दिलेले अडीच लाख रुपये पाण्यात गेले असून, ते वाचविण्यासाठी प्रतिसाद मिळवण्याची धडपड नव्हे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The Book Fair is organized; Let's do the reader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.