कोलकाता - लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्येभाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली राजकीय लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या विवादाचे पर्यावसान हिंसाचारात होत असून, नुकत्याच झालेल्या ताजा घटनेत उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजपा खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी अर्जुन सिंह यांच्य घरावर बॉम्बहल्ला केला आहे. तसेच हल्लेखोरांनी सिंह यांच्या घराच्या दिशेने गोळीबारही केला. बेराकपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या अर्जुन सिंह यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. तसेच घराच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला.' दरम्यान या हल्ल्याच्या घटनेनंतर खासदार अर्जुन सिंह यांच्या कुटुंबीयांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजपा खासदाराच्या घरावर बॉम्बहल्ला, अज्ञातांकडून गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 15:44 IST