शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 23:45 IST

उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यापूर्वी एका गावात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. ...

उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यापूर्वी एका गावात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. गावाच्या परिसरात सुमारे २० किमीपर्यंत मोठ्या प्रमाणावर स्फोटके पेरण्यात आली आहेत. तसेच एका ट्रकमध्ये ५०० किलो स्फोटकांचा साठा सापडल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. पोलिसांची भूमिकाही संशयास्पद दिसत आहे.

येत्या १० जूनला आदित्यनाथ चित्तौराला येत आहेत, त्यापूर्वीच सकंदरपूर गावात ही घटना उघडकीस आली आहे. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असला तरी पोलीस अधिकाऱ्याने तेथून तो अमोनिअम नायट्रेट स्फोटकांनी भरलेला ट्रक दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला बराच वेळ पोलीस आले नाहीत, गावकऱ्यांनी या संशयास्पद गोष्टी आमदारांच्या कानावर घातल्या. त्यांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीसांना देखील फोन करून याची माहिती दिली, तरीही तीन ते चार तास कोणी आले नाही. यामुळे शेवटी आमदारांनी लखनऊला फोन करून यंत्रणा हलविली तेव्हा हे अधिकारी पोहोचल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. 

तेल कंपनीच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली तीन वाहनांमधून सुमारे २०० लोक हरदी परिसरातील विविध गावांमध्ये पोहोचले होते. लांडग्याचा शोध घेण्यासाठी आल्याचे या लोकांनी गावकऱ्यांना सांगितले होते. परंतू, हे लोक जागोजागी सुरुंग पेरतात तशी स्फोटके पुरत होते. सुमारे २० किमी लांबवर या लोकांनी ही स्फोटके जमिनीत पुरली आहेत. साधुवापूर, लखनापूर, बालासराय, औरही आणि सिकंदरपूरसह २० किलोमीटरच्या परिघात ही स्फोटके पुरली आहेत. पोलीस अधिकारी स्फोटकांनी भरलेला कंटेनर जबरदस्तीने ग्रामीणांच्या तावडीतून सोडवत होता, असेही समोर आले आहे. 

प्रशासनाची सुत्रे हलल्यानंतर आता पोलिसांनी ७० लोकांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित शंभरहून अधिक लोक पळून गेले आहेत, त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांची पेरणी करणे यामागे कारस्थान काय असा सवालही उपस्थित होत आहे. तेल कंपनीच्या सर्वेक्षणाची माहिती मिळत आहे, परंतू पोलिस प्रशासनाला काहीही कळविण्यात आले नव्हते असे आता पोलीस अधिकारी सांगत आहेत. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश