शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब

By admin | Updated: January 30, 2016 04:21 IST

देशातील काही भागात अलीकडेच संशयित दहशतवाद्यांची धरपकड झाली असताना उत्तर प्रदेशात गुरुवारी रात्री एका रेल्वे प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे महानगरी एक्स्प्रेसचे डबे टाईमबॉम्बने

चित्रकूट : देशातील काही भागात अलीकडेच संशयित दहशतवाद्यांची धरपकड झाली असताना उत्तर प्रदेशात गुरुवारी रात्री एका रेल्वे प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे महानगरी एक्स्प्रेसचे डबे टाईमबॉम्बने उडविण्याचा कट उधळण्यात आला. वाराणसीहून मुंबईला जात असलेल्या महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील शौचालयातून हा शक्तिशाली टाईम बॉम्ब जप्त करण्यात आला. हा बॉम्ब एवढा शक्तिशाली होता की तो जेथे निष्क्रिय करण्यात आला, तेथे चार भलेमोठे खड्डे पडले. रेल्वेत या बॉम्बचा स्फोट झाला असता तर अनेक डबे उद्ध्वस्त झाले असते. रेल्वेचे अपर पोलीस महासंचालक सी.एस. मीना यांनी हे दहशतवाद्यांचे कृत्य असण्याची शक्यता फेटाळलेली नाही. या घटनेच्या तपासासाठी राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे (एनआयए) पथक घटनास्थळी पोहोचले असून रेल्वे पोलीस, विशेष कृती दल आणि दहशतवादविरोधी पथकानेही चौकशी सुरू केली आहे.या बॉम्बजवळ इंग्रजीत लिहिलेले एक पत्रही सापडले. परंतु त्यातील मजकूर सांगण्यास पोलीस महासंचालक मीना यांनी नकार दिला. वाराणसी ते माणिकपूरदरम्यान महानगरी एक्स्प्रेसचे चार थांबे आहेत. यापैकी एका रेल्वेस्थानकावर हा बॉम्ब पेरण्यात आला असावा असा कयास आहे. (वृत्तसंस्था)प्रवाशाच्या सतर्कतेने अनर्थ टळलामहानगरी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचच्या शौचालयात गुरुवारी रात्री एका प्रवाशाने हिरव्या रंगात गुंडाळलेली संशयास्पद वस्तू बघितली. त्याने लगेच रेल्वेतील सुरक्षा दलाच्या जवानांना याची सूचना दिली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन रेल्वेगाडी माणिकपूर रेल्वे स्थानकावर थांबविली. संशयित वस्तूची पाहणी केली असता तो एक टाईम बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. त्यात घड्याळ, तार आणि उपकरण जोडण्यात आले होते. हा बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला.दोन संशयित ताब्यात... महाबोधी एक्स्प्रेसमध्येही बॉम्बची सूचना मिळाल्याने रेल्वे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. तडकाफडकी ही गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. तसेच कुर्ला एक्स्प्रेसचीही तपासणी करण्यात आली. मात्र त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यानंतर त्या दोन्ही गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या, गुरूवारी महाबोधी एक्स्प्रेसमधून दोन संशयितांना ताब्यातही घेण्यात आले. ते दोघे बिहारचे आहेत.