ममता बॅनर्जींच्या काळात बॉम्ब कारखाने बांधले गेले - अमित शाह

By Admin | Updated: March 29, 2016 14:47 IST2016-03-29T14:47:58+5:302016-03-29T14:47:58+5:30

ममता बॅनर्जींच्या काळात फक्त बॉम्ब कारखाने बांधले गेले अशी टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली आहे

Bomb factories were built during Mamta Banerjee - Amit Shah | ममता बॅनर्जींच्या काळात बॉम्ब कारखाने बांधले गेले - अमित शाह

ममता बॅनर्जींच्या काळात बॉम्ब कारखाने बांधले गेले - अमित शाह

ऑनलाइन लोकमत - 
कोलाकाता, दि. २९ - ममता बॅनर्जींच्या काळात फक्त बॉम्ब कारखाने बांधले गेले अशी टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. 
 
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात अनेक कारखाने बांधले गेले मात्र ते उद्योगांसाठी नव्हते तर ते सर्व बॉम्ब कारखाने होते असं वक्तव्य अमीत शहा यांनी केलं आहे. भाजपा तृणमूल काँग्रेस किंवा डाव्या पक्षांशी हातमिळवणी करणार नसल्याचंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. भ्रष्टाचार, भीती आणि घुसखोरीचं समर्थन करत नसल्याने आम्ही डाव्यांसोबत किंवा ममता बॅनर्जींसोबत अजिबात जाणार नाही आहोत असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे.
 
 

Web Title: Bomb factories were built during Mamta Banerjee - Amit Shah