शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

"सुकेशला भेटण्यासाठी तिहारला BMW मधून जायचे, भेटीसाठी १.५ लाख रुपये मिळायचे"; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 17:48 IST

सुकेश चंद्रशेखर याच्या खंडणी प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन्ही अभिनेत्रींनी जबाब नोंदवून खुलासा केला आहे.  

सुकेश चंद्रशेखर याच्या खंडणी प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन्ही अभिनेत्रींनी जबाब नोंदवून खुलासा केला आहे.  या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसही अडचणीत सापडली आहे. जॅकलिन व्यतिरिक्त आणखी एक अभिनेत्री आहे जी सुकेश चंद्रशेखरमुळे कायदेशीर अडचणीत अडकली आहे आणि ती आहे नोरा फतेही. या दोन अभिनेत्रींशिवाय आणखी एक अभिनेत्री अडचणीत सापडली आहे. ही अभिनेत्री सुकेशला भेटण्यासाठी अनेकदा तिहार तुरुंगात गेली आहे. या प्रकरणात आणखी नवे खुलासे आले आहेत.

दिल्लीपोलिसांनी दाखल केलेल्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अनेक दावे केले आहेत.  एप्रिल-मे 2018 मध्ये सुकेशला भेटण्यासाठी तीन अभिनेत्री/मॉडेल तिहार तुरुंगात पोहोचल्या होत्या. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या तिन्ही अभिनेत्रींनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुकेशशी संबंधित सर्व गुपिते उघड केल्याचे म्हटले आहे. 'सुकेशने तिहार तुरुंगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांना बोलावून घेतले होते, असं यात म्हटले आहे. 

'गदर 2', सकीना आणि तारा सिंगला केलं मालामाल, जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्टचं मानधन

तुरुंगात असतानाही सुकेश चंद्रशेखर ऐशमध्ये जीवन जगत होता असं दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. 'या अभिनेत्री सुकेशला भेटण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये घेत असत आणि 45 मिनिटे ते 1 तास भेटत असत. इतकंच नाही तर जेव्हा एखादी अभिनेत्री सुकेशला भेटायला यायची तेव्हा तिला एक खास खोली दिली जायची, तिथे टीव्ही, फ्रीज आणि एसीची व्यवस्था केली जायची. येथे तो अभिनेत्रींना भेटत असे, दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.  मात्र, या तिसऱ्या अभिनेत्रीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

या सर्व गोष्टी या अभिनेत्रींनीच चौकशीदरम्यान सांगितल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. सुकेशला भेटण्यासाठी तिहारला जायचे होते, तेव्हा एक बीएमडब्ल्यू कार त्यांना घेण्यासाठी यायची, जी तीन क्रमांकाच्या गेटमधून तुरुंगात जायची. या प्रकरणी तिहार तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल यांना निलंबित करण्यात आले आहे, असंही पोलिसांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसbollywoodबॉलिवूडdelhiदिल्लीPoliceपोलिस