बॉलिवूड स्टार- खासदार फुटबॉल सामना रंगणार

By Admin | Updated: July 8, 2016 19:24 IST2016-07-08T19:24:43+5:302016-07-08T19:24:43+5:30

बॉलिवूड स्टार आणि खासदार यांच्यात २४ जुलै रोजी जवाहरलाल नेहरूस्टेडियममध्ये फुटबॉल सामना रंगणार आहे. जगभरातील नव्या दमाच्या प्रतिष्ठित लोकांना प्रोत्साहन मिळावे या हेतून सामन्याचे आयोजन करण्यात आले

Bollywood star- MPs to play in football | बॉलिवूड स्टार- खासदार फुटबॉल सामना रंगणार

बॉलिवूड स्टार- खासदार फुटबॉल सामना रंगणार

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ८ : बॉलिवूड स्टार आणि खासदार यांच्यात २४ जुलै रोजी जवाहरलाल नेहरूस्टेडियममध्ये फुटबॉल सामना रंगणार आहे. जगभरातील नव्या दमाच्या प्रतिष्ठित लोकांना प्रोत्साहन मिळावे या हेतून सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदारांच्या संघाचे नेतृत्व केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो करणार असून या संघात खा. आणि गायक मनोज तिवारीचा समावेश आहे.
आॅल स्टार्स फुटबॉल क्लबमध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, दिनो मॉरियो आदींचा समावेश राहील. अनेक बॉलिवूड स्टार्स या सामन्याला हजेरी लावणार आहेत. योगगुरू बाबा रामदेव हे सामन्याचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर तर अभिनेत्री प्रियंका कोठारी गुडवील अ‍ॅम्बेसिडर असेल. या आयोजनामागील हेतू बेटी बचाव, बेटी पढाव या मोहिमेला बळ देणे हा असल्याचे प्रियंका कोठारी यांनी सांगितले.

Web Title: Bollywood star- MPs to play in football