शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींविरोधात बोलायला लागल्यापासून बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 18:52 IST

प्रकाश राज पुन्हा पंतप्रधान मोदींवर बरसले

मुंबई: पंतप्रधान मोदींवर टीका करायला लागल्यापासून बॉलीवूडनं मला चित्रपटाच्या ऑफर्स देणं थांबवलं, असं अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटलंय. जेव्हापासून मी मोदी आणि भाजपच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलीय, तेव्हापासून मला बॉलीवूडमधून चित्रपट मिळत नसल्याचा आरोप प्रकाश राज यांनी केला. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचा खून करण्यात आल्यानंतर राज यांनी मोदी आणि भाजपवर कठोर शब्दांमध्ये टीका केली होती. तेव्हापासून ते सातत्यानं भाजपच्या विरोधात भूमिका घेताहेत. 'गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी पहिल्यांदा पंतप्रधान मोदींविरोधात भूमिका घेतली होती. तेव्हापासून मला बॉलीवूडनं बाजूला टाकलंय. दक्षिण भारतात कोणतीही समस्या नाही. मात्र बॉलीवूडमधून चित्रपटाच्या ऑफर येणं बंद झालंय,' असं राज 'द प्रिंट'शी बोलताना म्हणाले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गौरी लंकेश यांची बंगळुरूत हत्या करण्यात आली होती. काही अज्ञातांनी लंकेश यांच्या घराबाहेर त्यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी विशेष तपास पथकानं एकाला अटक केली होती. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. गौरी लंकेश आणि प्रकाश राज यांच्यात अनेक वर्षांपासून चांगली मैत्री होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे प्रकाश राज अतिशय अस्वस्थ झाले होते. यावेळी प्रकाश राज यांनी भाजपावर थेट हल्ला केला. 'गौरी लंकेश प्रश्न विचारत होत्या. त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हापासून मी स्वत:लाच दोषी मानू लागलो. लंकेश यांच्या संघर्षात आपण त्यांना एकटं सोडलं होतं का? याबद्दल मी जितके प्रश्न विचारतो, तितके मला गप्प करण्याचे प्रयत्न होतात. मला धमक्या दिल्या जातात आणि हे भाजपाकडून केलं जातंय,' असं प्रकाश राज यांनी म्हटलंय.  

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण