बोगस पोलिसांचा गोव्यात २ महिलांवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: June 4, 2015 14:00 IST2015-06-04T09:32:24+5:302015-06-04T14:00:20+5:30

पोलिस असल्याचे भासवत पाच जणांनी गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Bogus police group gang rape in 2 women | बोगस पोलिसांचा गोव्यात २ महिलांवर सामूहिक बलात्कार

बोगस पोलिसांचा गोव्यात २ महिलांवर सामूहिक बलात्कार

>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ४ - पोलिस असल्याचे भासवत पाच जणांनी गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अंजुना बीचजवळ सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुक्रमे २८ व ३४ वर्षांच्या या दोन महिला टॅक्सीने अंजुना बीच येथे जात असताना अरपोरा गावाजावळ पाच पोलिसांनी त्यांना अडवले. आपण अँटी-नार्कोटिक्स विभागातील पोलिस अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या दोन महिलांना जवळच्याच चलण्यास सांगत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.
'त्या कथित पोलिसांनी त्या महिलांकडून दीड लाख रुपयांची मागणी केली व ते पैसे न दिल्यास त्यांच्यावर नार्कोटिक्स ड्रग अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच त्या पाच जणांनी महिलांना मारहाणही केली व टॅक्सी ड्रायव्हरलाही लुटून त्याचा मोबाईल व एटीएम कार्ड काढून घेऊन १० हजार रुपये लुटल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी टॅक्सी ड्रायव्हरला त्याची टॅक्सी त्या रिसॉर्टवरच सोडून दीड लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. 
टॅक्सी ड्रायव्हरने तातडीने पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी त्या नराधमांना अटक केली. अजय कुमार (गोवा), जीवन पवार (कर्नाटक), नदीम खान (राजस्थान), ट्रेव्हर व्हिक्टर जोसेफ (मुंबई) आणि कमलेश चौधरी ( हैदराबाद) अशी त्या पाच आरोपींची नावे असून ते २१ ते २७ वयोगटातील आहेत. दरम्यान पीडित महिलांची वैद्यकीय चाचणी करण्याच आल्यानंतर त्या पाच नराधमांविरोधात बलात्कार, मारहाण, अपहरण आणइ लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bogus police group gang rape in 2 women