अंगरक्षकाने मारला डोळा म्हणून तिने फोडली नेत्याची मर्सिडीज

By Admin | Updated: May 19, 2015 11:18 IST2015-05-19T11:14:46+5:302015-05-19T11:18:52+5:30

समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या अंगरक्षकाने डोळा मारत अश्लील हावभाव केल्यामुळे संतापलेल्या तरूणीने थेट त्या नेत्याची 'मर्सिडीज' कार रोखून तिची तोडफोड केल्याची घटना आग्रा शहरात घडली.

The bodyguard blasted her as an eye-opener, and then blasted the leader's Mercedes | अंगरक्षकाने मारला डोळा म्हणून तिने फोडली नेत्याची मर्सिडीज

अंगरक्षकाने मारला डोळा म्हणून तिने फोडली नेत्याची मर्सिडीज

>ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. १९ -  समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या अंगरक्षकाने डोळा मारत अश्लील हावभाव केल्यामुळे संतापलेल्या तरूणीने थेट त्या नेत्याची 'मर्सिडीज' कार रोखून तिची तोडफोड केल्याची घटना आग्रा शहरात घडली आहे. रविवारी हा प्रकार घडला असून ती युवती पक्षाच्या झेंड्याने कारची तोडफोड करतानाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल झाला आहे
साध्वी पांडे असे त्या तरूणीचे नाव असून ती दुचाकीवरून बहिणीसह जात होती. त्याचवेळेस समाजवादी पक्षाचे नेते अभिनव शर्मा त्यांच्या मर्सिडीज कारमधून घरी जात होते. कारमध्ये बसलेल्या शर्मा यांच्या अंगरक्षकाने साध्वी यांच्याकडे पाहून डोळा मारत अश्लील हावभाव केले. हे कृत्य लक्षात येताच साध्वीने मोबाईलमधून त्या नेत्याच्या कारचे फोटो काढले. मात्र त्या अंगरक्षकाने तो मोबाईल तिच्याकडून हिसकावून घेतला आाणि फोडून टाकला. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या साध्वीने थेट त्या कारवर चढत कारची तोडफोड केली. तसेच नेते अभिनव शर्मा व त्यांच्या अंगरक्षकाविरोधात घोषणाबाजीही केली.याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The bodyguard blasted her as an eye-opener, and then blasted the leader's Mercedes