बॉडीबिल्डर खून प्रकरण

By Admin | Updated: January 22, 2015 00:06 IST2015-01-22T00:06:51+5:302015-01-22T00:06:51+5:30

बॉडीबिल्डरच्या खुनातील

Bodybuilder Blood Case | बॉडीबिल्डर खून प्रकरण

बॉडीबिल्डर खून प्रकरण

डीबिल्डरच्या खुनातील
आणखी एका आरोपीस अटक

नागपूर : बॉडीबिल्डर रितेश भैसवारे याच्या खूनप्रकरणी शहर गुन्हे शाखा पोलिसांनी आणखी एका आरोपीला नागपूर रेल्वेस्थानक भागात अटक केली. आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला.
पुरंदर ऊर्फ पाजी राम यादव (२२), असे या आरोपीचे नाव असून तो वर्मा ले-आऊट येथील रहिवासी आहे. यापूर्वी सूत्रधार अश्विन तुरकेल, निखील डागोर आणि संदीप महतो यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.
वर्चस्व आणि जुन्या वैमनस्यातून १३ जानेवारी रोजी सकाळी ९.३५ वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर येथील स्वप्निल रजनी अपार्टमेंटस्थित एसबीआय एटीएमसमोर भररस्त्यावर आमदार निवासमागे राहणाऱ्या रितेश रमेश बैसवारे याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून , चाकू व सुरीने अनेक वार करून खून करण्यात आला होता.
घटनेच्या चार-पाच दिवसांपूर्वीपासून तुरकेल हा बैसवारे याच्या अमरावती मार्गावरील कपड्याच्या दुकानासमोर उभा राहून त्याला धमक्या देत होता. त्यानेच खुनाचा कट रचला होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या साथीदारांना सोबत घेऊन बारबेरियम जिमच्या खाली जिन्याजवळ दबा धरून होता. बैसवारे हा जिममध्ये जाण्यासाठी जिना चढू लागताच तुरकेल याने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकली होती. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून रस्त्यावरच निघृर्ण खून केला होता.
या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. त्यातील दोन आरोपी आशिष बघेल आणि आशिष गायकवाड हे फरार आहेत. या आरोपींना अटक करावयाची आहे, असे सरकार पक्षाने न्यायालयाला सांगून आरोपी यादवचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील विजयालक्ष्मी अडगोकर यांनी काम पाहिले.

Web Title: Bodybuilder Blood Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.