शिवाजी उद्यानातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला मेहरुणमधील घटना : हत्या की आत्महत्या याविषयी संभ्रम
By Admin | Updated: April 12, 2016 00:38 IST2016-04-12T00:38:28+5:302016-04-12T00:38:28+5:30
जळगाव : मेहरूण परिसरात असणार्या शिवाजी उद्यानातील विहिरीत सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याविषयी संभ्रम आहे. त्याची ओळख पटल्यानंतरच या गोष्टींचा उलगडा होणार आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
