कुकडी कालव्यात तरुणाचा मृतदेह
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:18+5:302015-02-18T00:13:18+5:30
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडीच्या कालव्यात सोमवारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.

कुकडी कालव्यात तरुणाचा मृतदेह
ज ळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडीच्या कालव्यात सोमवारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. कैलास संपत दंडवते (वय ३५) हे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत शांताराम नामदेव सालके यांनी निघोज दूरक्षेत्राला खबर दिली. कैलास दंडवते नेहमीप्रमाणे नारायणपूर येथे दर्शनासाठी गेले होते. चार दिवस उलटूनही घरी न परतल्याने त्यांचा जवळे येथे शोध घेतला. परंतु सोमवारी दुपारी चार वाजता त्यांचा मृतदेह कुकडी कालव्यात आढळून आला, असे सालके यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास निघोज दूरक्षेत्रचे पो.कॉ. आरोटे करीत आहेत.