शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले ती आमची मुलगी नाही, पीडितेच्या कुटूंबियांचा खळबळजनक दावा 

By पूनम अपराज | Updated: October 3, 2020 18:21 IST

Hathras Gangrape : एआयटी किंवा सीबीआयच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही असेही कुटुंबाने सांगितले आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातल्याहाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून उत्तर पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व गावात येणारे रस्ते पोलिसांनी सील करून नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर मीडियाला गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी पत्रकारांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतले, त्यावेळी कुटुंबाने खळबळजनक आरोप केला की, पोलिसांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पीडित कुंटुंबाला पीडित मृत मुलीचा चेहरा न दाखवताच परस्पर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. यामुळेच आणखी या घटनेबाबत देशात संताप निर्माण झाला. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने एसआयटी स्थापन केली असून ते तपास करत आहेत. मात्र, एआयटी किंवा सीबीआयच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही असेही कुटुंबाने सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांवरही कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. पीडितेच्या कुटुंबाने हाथरसचे डीएम आणि जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली, त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतले. तसेच त्यांना संपूर्ण केस बदलून टाकू अशी धमकी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.  

 

पूर्ण केस बदलून टाकेन, काहीच होणार नाही, डीएमने धमकावल्याचा पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप 

पीडितेचा भाऊ पोलिसांचा पहारा चुकवून शेतातून लपून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीपर्यंत कसाबसा पोहोचला. त्यावेळी त्याने सांगितले की, 'पोलिसांनी आमच्याकडून मोबाइल फोन हिसकावून घेतले आणि कुणाशीही संपर्क साधू दिला नाही. घरातून कुणालाही बाहेर येण्यास मनाई केली आहे. आमच्या कुटुंबाला मीडियाशी बोलायचे आहे. मात्र, आम्हाला घरातून बाहेर येता येत नाही. पोलिसांनी घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे. घरासमोर, रस्ते, शेतात पोलीस तैनात करण्यात आले आहे. याला विरोध केला असता डीएम प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या वडिलांच्या छातीवर लाथ मारली होती. त्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर सर्वांना घरात बंद करण्यात आले असल्याची माहिती पीडित्याच्या भावाने मीडियाला सांगितली. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशcollectorजिल्हाधिकारी