तामिळनाडूत हॉस्टेलमध्ये आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह

By Admin | Updated: February 28, 2016 16:24 IST2016-02-28T16:24:51+5:302016-02-28T16:24:51+5:30

तामिळनाडूमध्ये वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केली आहे. परिथीचा मृतदेह हॉस्टेलमधील त्याच्या रुममध्ये आढळला आहे

The body of the student found in the hostel in Tamilnadu | तामिळनाडूत हॉस्टेलमध्ये आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह

तामिळनाडूत हॉस्टेलमध्ये आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह

ऑनलाइन लोकमत -
चेन्नई, दि. २८ - तामिळनाडूमध्ये वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केली आहे. परिथीचा मृतदेह हॉस्टेलमधील त्याच्या रुममध्ये आढळला आहे. परिथीच्या मित्रांनी त्याचा मृतदेह पंख्याला लटकल्याचं पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं. कन्याकुमारी जिल्ह्यात असणा-या श्री मुगम्बिका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायनसमधील ही घटना आहे. 
 
परिथ हा दलित असून त्याचे वडिल सरकारी नोकरी करतात. परिथीच्या वडिलांनी मात्र त्याने आत्महत्या केली नसल्याची शंका उपस्थित केली आहे. त्याच्याकडे आत्महत्या करण्यासारखं कोणतंच कारण नव्हत असं त्यांनी म्हणल आहे. पोलिसांना मात्र घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 
 

 

Web Title: The body of the student found in the hostel in Tamilnadu