जेएनयूच्या हॉस्टेलमध्ये आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह
By Admin | Updated: October 26, 2016 06:09 IST2016-10-26T02:44:17+5:302016-10-26T06:09:20+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये राहणा-या एका विद्यार्थ्याचा मृतदेह मंगळवारी रात्री आढळला.

जेएनयूच्या हॉस्टेलमध्ये आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये राहणा-या एका विद्यार्थ्याचा मृतदेह मंगळवारी रात्री आढळला.
जे. आर. फिलेमोन असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून ईशान्येकडील मनीपूर जिल्ह्यातील सेनापती येथील तो रहिवाशी होता. जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी आला होता. ब्रम्हपुत्रा हॉस्टेलमधील १७१ खोलीमध्ये जे. आर. फिलेमोनचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या तीन दिवसांपासून जे. आर. फिलेमोन विद्यापीठात दिसला नाही. ज्यावेळी त्याच्या खोलीमधून उग्र वास येऊ लागला. त्यावेळी बाजूच्या खोलीमधील विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना आणि सुरक्षा रक्षकाला सांगितले. त्यानंतर त्याच्या खोलीचा दरवाजा उघडून पाहिले, असता त्याचा मृतदेह आढळला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिका-यांने सांगितले.
दरम्यान, जे. आर. फिलेमोनच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून पोलीस तपास करत आहेत.
Student JR Philemon Raja from Manipur found dead in Brahmaputra Hostel (JNU) by other students.
— ANI (@ANI_news) October 25, 2016