बेपत्ता पोलिसाचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:02+5:302015-08-11T23:16:02+5:30

नागपूर : गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पोलीस शिपायाचा अखेर मृतदेहच आढळला.

The body of the missing policeman was found | बेपत्ता पोलिसाचा मृतदेह आढळला

बेपत्ता पोलिसाचा मृतदेह आढळला

गपूर : गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पोलीस शिपायाचा अखेर मृतदेहच आढळला.
श्रीराम अवधकिशोर मिश्रा (वय ४२) असे मृताचे नाव आहे. तो पोलीस लाईन टाकळी, गिट्टीखदान येथे राहात होते. मिश्रा २८ जूनला घरून निघून गेले. यावेळी त्यांनी एक लाख रुपये आणि कपडे सोबत नेले होते. त्यांचा सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही ते आढळले नाही. त्यामुळे पत्नी निर्मल मिश्रा यांनी गिट्टीखदान ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मंगळवारी सकाळी ८.२० च्या सुमारास फुटाळा तलावात मिश्राचा मृतदेह आढळला. मिश्राला तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्याने आत्महत्या केली की कुणी त्याचा घातपात केला, ते स्पष्ट झालेले नाही. डॉ. प्रियंका आशिष शर्मा (वय २९, रा. अनंत नगर) यांच्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---

Web Title: The body of the missing policeman was found