सी लिंकवरुन आत्महत्या करणार्या तरुणाचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: June 2, 2014 23:43 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-02T23:43:55+5:30
सी लिंकवरुन आत्महत्या करणार्या तरुणाचा मृतदेह सापडला

सी लिंकवरुन आत्महत्या करणार्या तरुणाचा मृतदेह सापडला
स लिंकवरुन आत्महत्या करणार्या तरुणाचा मृतदेह सापडलामुंबई: वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून आत्महत्या करणार्या नरेश संचेती(२८) या तरूणाचा मृतदेह शोधण्यात पोलीस-अग्निशमन दलाला यश आले. सकाळी वरळी जेटी परिसरात नरेशचा मृतदेह सापडला. नरेशने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती वरळी पोलिसांनी दिली.दादरमधील सिंधी सागर परिसरात राहणार्या नरेशचे वडील व्यावसायिक आहेत. काल संध्याकाळी पाचच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. हुंदाई आयटेन गाडीतून तो सागरी सेतूवर पोचला. सेतूवर गाडी थांबवून त्याने घरी फोन केला. मी घरी येणार नाही, गाडी सेतूवर आहे, ती घेऊन जा.. इतके सांगून त्याने फोन कट केला आणि सेतूवरून खाली समुद्रात उडी घेतली. नरेशला उडी मारताना एका वाहनचालकाने पाहिले. त्याने तात्काळ ही बाब पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानुसार वांद्रे आणि वरळी पोलीस ठाण्यातील अधिकारी सागरी सेतूवर पोहोचले. तेव्हापासूनच नरेशची शोधमोहिम सुरू झाली होती. वरळी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे. यात पोलीस नरेशच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेणार आहेत. तसेच त्याच्या मीत्रपरिवाराकडेही चौकशी करणार आहेत.