बॅँकेच्या ओट्यावर आढळला वृध्दाचा मृतदेह
By Admin | Updated: July 28, 2016 22:27 IST2016-07-28T22:27:56+5:302016-07-28T22:27:56+5:30
जळगाव: सिंधी कॉलनीला लागून असलेल्या एका बॅँकेच्या ओट्यावर गुरुवारी सकाळी एका ७२ वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला. ही घटना जिल्हा पेठ पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता पांडुरंग भादू महाजन (रा.मयूर कॉलनी, जळगाव) यांचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. ते सकाळी फिरायला आले होते. बॅँकेच्या ओट्यावर बसले असता तेथे बेशुध्द पडले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यावेळी मुलगा सोपान महाजन यांना बोलावण्यात आले. त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बॅँकेच्या ओट्यावर आढळला वृध्दाचा मृतदेह
ज गाव: सिंधी कॉलनीला लागून असलेल्या एका बॅँकेच्या ओट्यावर गुरुवारी सकाळी एका ७२ वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला. ही घटना जिल्हा पेठ पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता पांडुरंग भादू महाजन (रा.मयूर कॉलनी, जळगाव) यांचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. ते सकाळी फिरायला आले होते. बॅँकेच्या ओट्यावर बसले असता तेथे बेशुध्द पडले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यावेळी मुलगा सोपान महाजन यांना बोलावण्यात आले. त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शिवणक्लासला गेलेली महिला झाली गायबजळगाव: शिवणक्लास जाते असे सांगून घरातून गेलेली ३८ वर्षीय महिला गायब झाल्याची घटना ममुराबाद येथे घडली आहे. बुधवारी सकाळी साडे दहा वाजता ही महिला ममुराबाद गावातून गेली, दोन दिवसात परत न आल्याने पतीने तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.