खून प्रकरण
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:20+5:302015-02-11T00:33:20+5:30
१९ लाखांच्या वसुलीसाठी

खून प्रकरण
१ लाखांच्या वसुलीसाठीखून, चौघांना जामीन नाकारलानागपूर : फ्लॅटच्या १९ लाखांच्या वसुलीसाठी कट रचून निघृर्णपणे खून केल्याप्रकरणी चार आरोपींचा जामीन अर्ज मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. आशुतोष गजानन वानकर रा. एचबी इस्टेट सोनेगाव, मदनकुमार बाबूलाल श्रीवास, राजू ऊर्फ राजकुमार अशोक गौळकर आणि आशिष नारायण अंबादे, अशी आरोपींची नावे आहेत. संजय प्रभाकर महाजन (४०) रा. पांडुरंग गावंडेनगर प्रतापनगर, असे मृताचे नाव होते. प्रकरण असे, संजय महाजन याने एचबी इस्टेट सोनेगाव येथे १९ लाखात अर्धा फ्लॅट बिल्डरकडून विकत घेतला होता. ही रक्कम महाजन याने आशुतोष वानकर याला द्यावी, असे ठरले होते. महाजन हा पैसे देत नसल्याने आशुतोषने त्याला कायमचे संपवण्याची योजना आखली होती. १८ ऑगस्ट २०१४ रोजी दुपारी ३ - ४ वाजताच्या सुमारास आशुतोषने फोन करून महाजन याला बोलावले होते. त्याला एमएच-३१-सीआर-६००१ क्रमांकाच्या टाटा सफारीमधून नेण्यात आले होते. अंबाझरी हिल टॉप भागात त्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिर्सी येथील सुनील कवडू देसाई यांच्या शेतानजीक फेकून देण्यात आला होता. मृताची अंगठी, कडा, गोफ आणि कपडे काढण्यात आले होते. केवळ बनियान आणि अंडरवियर होती. बेला पोलिसांनी भादंविच्या ३०२, २०१, १२० (ब), १४३, ४०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान मृताची पत्नी प्रियंका हिने पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अशोक देवतळे यांनी बेपत्ता तक्रारीचा आधार घेत प्रियंका महाजन हिला गाठले होते. तिने आपल्या पतीची ओळख पटवून आशुतोषवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करताच त्याने खुनाची कबुली दिली होती. त्याने खुनात सहभागी आरोपींची नावे उघड करताच पोलिसांनी मदनकुमार श्रीवास, राजू गौळकर, आशिष अंबादे, राजू धुपे, दीक्षित यांना अटक केली होती. त्यापैकी चौघांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील संदीप डोंगरे, विलास पाघघन आणि अजय माहूरकर यांनी काम पाहिले.