स्टेट बँकेने केले ई-वॉलेट्स ब्लॉक

By Admin | Updated: January 5, 2017 05:12 IST2017-01-05T05:12:23+5:302017-01-05T05:12:23+5:30

नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्यापासून पेटीएमसह अनेक ई-वॉलेटना अच्छे दिन आले

Blocked e-Wallet blocks by State Bank | स्टेट बँकेने केले ई-वॉलेट्स ब्लॉक

स्टेट बँकेने केले ई-वॉलेट्स ब्लॉक

नवी दिली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्यापासून पेटीएमसह अनेक ई-वॉलेटना अच्छे दिन आले असले तरी सर्वात मोठ्या आणि सरकारच्या स्टेट बँक आॅफ इंडियाने ई-वॉलेट्सना जबदस्त दणका देताना सर्व ई-वॉलेट्स ब्लॉक केले आहेत.
स्टेट बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे नेट बँकिंगमधून पेटीएम, मोबी क्विक एअरटेल मनीसह अन्य ई-वॉलेट्समध्ये पैसे पाठवता येणार नाहीत. मात्र क्रेडिट कार्डमधून या ई-वॉलेट्समध्ये पैसे जमा करता येतील.

संरक्षण व व्यावसायिक हित जपण्यासाठी...
स्टेट बँकेच्या ई-वॉलेट्स ब्लॉक करण्याच्या निर्णयाबाबत रिझर्व्ह बँकेने खुलासा मागवला असता, संरक्षण व व्यावसायिक हित जपण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे स्टेट बँकेने सांगितले आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. ग्राहकांच्या खात्यांच्या सुरक्षेचा विचार करून पेटीएमला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. पेटीएमचा वापर करताना काही ग्राहकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले होते. दुसरीकडे काही ग्राहकांनी पेटीएमची फसवणूक केल्याच्याही तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र पेटीएमला ब्लॉक करण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असून सुरक्षेची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात येईल, असे स्टेट बँक आॅफ इंडियातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Blocked e-Wallet blocks by State Bank